Wednesday, 14 January 2015

Santaji Maharaj Punyatithi, Din Darshika and Book Publication

प्रा. डॉ. सुधाकर चौधरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
श्री संत संताजी जगनाडे महाराजाच्या ३१५ व्या पुण्य तिथी सोहळ्यामध्ये राहुरी कॉलेजचे प्रा. डॉ. सुधाकर चौधरी यांनी लिहीलेल्या अप्लाईड झुलॉजी ऍनीमल सिस्टीमॅटीक्स या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांतिक तेली समजाचे कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुषण कर्डिले, नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, बाजा समितीचे सभापती अरूण तनपुरे, तेली समाजसेवक साप्ताहीकाचे संपादक प्रा. वसंतराव कर्डिले स्नेहीजनचे संपादक छगन मुळे, तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ डोळसे तालुका तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे सदाशिव पवार, संजय पन्हाळे, संदीप सोनवणे, वाय. एस. तनपुरे उपस्थीत होते.
            मा.डॉ. चौधरी यांनी लिहीलेल्या पुस्तका विषयी अभिप्राय व्यक्त करताना श्री. तनपुरे म्हणाले डॉ. चौधरी यांनी आज पर्यंत पुस्तकाचे प्रकाशन ३० संशोधन पेपर ३० जनरल लेख लिहीले असुन राहुरी कॉलेजमध्ये ३१वर्षापासुन कार्यरत आहे त्यांनी लिहीलेले प्रस्तकाविषयी बोलताना म्हणाले सध्याच्या युगात प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र सारख्या पुस्तकांना अभ्यासक्रमात महत्व असुन विद्यार्थ्यांच्या द्दष्टीने साध्या भाषेत मोजक्या शब्दात लिहीली असुन तेली समाजातही डॉ. चौधरी, डॉ. कर्डीले सारखे कार्यकर्ते शौक्षणीक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करीत आहे. डॉ. चौधरी यांनी महाविद्यालयात आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धा, राज्यस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा आयोजीत री आहे. (News also available on www.Teliindia.com, Snehijan, Sakal 6Jan. Ahmednagar Edition, Facebook )

दिनांक : 2015-01-08 10:38:58
राहुरी तालुका तेली समाज श्री. संत संताजी जगनाडे महाराज ३१५ वी पुण्यतिथीचा कार्यक्रम

             श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची ३१५ वी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुका - तेली समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी संताजी महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खा. प्रसादराव (बापूसाहेब) तनपुरे डॉ. सौ. उषाताई तनपुरे - नगराध्यक्षा राहुरी . . मा. अरूणसाहेब तनपुरे, सभापती राहुरी
ता. कृषीउत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. बापुसाहेब तनपुरे
यांनी श्री. संत संताजी जगनाडे महाराज्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिली. श्री. संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा ही पाण्यावर तरंगली म्हणजे ती पुन्हा लिखान झाले. लोकांच्या तोंडीपाठ असलेले अभंग लिहण्याचे कार्य श्री. संत संताजी जगनाडे महाराजांनी केले आहे. लिहीण्याची कला ही त्यावेळचा तेलाचा व्यवसाय करून जोपासण्याचे कार्य जगनाडे महाराजांनी केले म्हणुन आज आपण सर्वांना तुकारामांची ४००० अभंगाची गाथा अभ्यासासाठी, ज्ञान साधना करण्यासाठी मिळाली म्हणजे जिवीत आहे.
             महाराष्ट्राची कुलदैवत श्री. तुळजाभवानीची पालखी राहुरी येथे तयार करण्यात येते. ही एकमेवे अशी पालखी आहे. या पालखीची प्रतिमा या दिनदर्शिकेत प्रसिद्ध केली आहे. ही तेली समाजाने सर्वासाठी केलेली पंरपरा, संस्कृती यांची जोपासना करणारी आहे. पालखीच्या मानकर्यांचा सत्कार राहुरी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात यतो. राहुरी नगरपरिषदे कडुन मी सामाजीक कार्यास सहकार्य करण्याचे सुचित करित असे उद्गार नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी काढले आहे.
             ज्याच्या गावात / देशात तेली ते गाव / देश भाग्यशाली आहे. असे आता म्हणण्याची वेळ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणुन दिली आहे. असे. उद्गार मा. डॉ. प्राचार्य भुषण वसंतराव कर्डीले - महासचिव प्रांतीक तैलिक महासभा यांनी काढले आहे.
             समाज हा नातेगोती जपण्यासाठी नसुन समाजविकास अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या जोखंडातून सामान्य माणसाची सोडवणुक करतो. त्याचा आर्थिक बचत करतो तो खरा समाज. पोट जातीच्या भिंती तोडून नव जागृती करतो तो समजा या मार्गाने जाऊन घडवण्याचे कार्य आपणा सर्वाना करावयाचे आहे. असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गजानन शेलार (नाना) कोशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांनी केले आहे.
             या कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे जिल्हासचिव सदाशिव पवार (सर) राहुरी तालुका तेली समाज महासभा अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. प्रा. सुधाकर चौधरी, राहुरी शहर तेली समाज अध्यक्ष संजय पन्हाळे, खजिनदार रावसाहेब शेजुळ, ... गोकुळ अप्पा, ... नामदेव महाराज शेजुळ , ओबीसी सेल अध्यक्ष संदिप सोनवणे दत्तात्रय क्षिरसागर तालुका कार्यकारीणी शहर कार्यकारीणी तेली समाज यांनी केले होते.
             सुत्रसंचालन :- अॅड. तात्यासाहेब डोळसे यांनी केले. सर्वांचे स्वागत आभार सदाशिव पवार (सर) यांनी मानले आहेत.

राहुरी तालुका तेली समाज महासभेच्या कार्यक्रमास उपस्थिती

              मा. चंद्रकांतजी व्हावळ, अध्यक्ष पुणे जिल्हा तेली समाज महासभा (ग्रामीण) मा. हरिभाऊ डोळसे, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा मा. संभाजी जाधव - उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा मा. विजय काळे - अध्यक्ष - अहमदनगर शहर तेली समाज महासभा मा. वसंतराव कर्डीले - संपादक - समाजसेवक मासिक, नाशिक मा. छगन मुळे - संपादक - स्नेहजन तेली समाज मासिक बीड मा. भागवत लुटे - अध्यक्ष - रहाता तालुका तेली समाज महासभा मा. भरत साळुंके, अध्यक्ष श्रीरामपुर तालुका तेली समाज महासभा मा. रमेश दिवटे - अध्यक्ष - संगमनेर तालुका तेली समाज महासभा मा. रमेश गवळी - अध्यक्ष - कोपरगाव तालुका तेली समाज महासभा मा. बाळासाहेब गायकवाड - अध्यक्ष - कोपरगाव तालुका तेली समाज महासभा मा. .. . रामदास महाराज क्षिरसागर केडगाव
जिल्हा, तालुका, गाव तेली समाजाचे प्रतिनिधी महिला आघाडीच्या अध्यक्षा :- सौ. संजना लोखंडे, कार्याध्यक्ष सौ. प्रमिला घोडके आदी उपस्थित हाते. 
राहुरी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाय. एस. तनपुरे, प्रकाश जगधने, रावसाहेब तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक : 2015-01-07 11:16:42(News also available on www.Teliindia.com, Snehijan, Facebook, Punya nagari 6 Jan., Nagar Kesari 8th Jan.)