Saturday 1 September 2018

आई तुळजाभवानी तुळजापूर माहिती

   
आई तुळजाभवानी तुळजापूर  माहिती 

तुळजापूरची भवानीमाता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून  एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे.

मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा-परंपरांबद्दल माहिती नसते.
म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा-परंपरांचा हा परिचय-

श्री श्रेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्ती पीठ! वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो.
बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात.
परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत,
त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते.
त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते.
ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते.
घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो.
अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही.
श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात,
त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम-पाटिल पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे.
यांच्या व्यतिरिक्त कुणीही असलातरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते.
मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा असावी.
यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरविण्याची जबाबदारी परंपरेनेयेथील पाणेरी मठाच्या महंताकडे आहे.
साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे.
मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.
वीरांची देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे.
पैकी तुळजाभवानी ही महिषमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं.
म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे.
त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो.
बालाघाट डोंगररांगातील प्राचीनकाळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं.
तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात.
त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्राआणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायमआहे.
एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं.
वर्षांतून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपविली जाते.
तर सीमोल्लंघना करिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे.
तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगांव गोर माळय़ाच्या लोकांचा आहे.
याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती.तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते.निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबे गाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो.
छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलंजातं.
याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे.देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते.
ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशामोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात.
त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे.लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडूनयेतो.
देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा.
सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो.तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचेकाम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात.मूळ नाव चिंचपूरतुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टरत्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे.
यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस-सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. त्यांच्यासोबत पानेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरिता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात. महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवरमतभेद वाढत गेल्याने हैद्राबाद संस्थानमधील धार्मिक विभागाने १९१९ साली ‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला.
त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आले असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.
तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात.
त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे.
साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते.
देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपणआहे.
भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते. गेल्या अनेक दशकांपासून उपरकर हा नैवेद्य देतात. याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यांसारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात.
देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत.
शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात.
पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते.
दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्ये शिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.
तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खेगावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालतनाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत.तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलतजाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.
देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो.
देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो.
शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते.
ही परंपरा आजही जोपासली जाते.
काळभैरव रखवालदार आहे. तो वर्षांतून एकदाअश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो.
त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा.
भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते.
ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पणया भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते.
त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो.
मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात.
अश्विन अमावस्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो.
ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते.
या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो,
तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथापरंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही.
हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकचुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे.
श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात.
एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो.
गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे.
या प्रमाण परंपरेला प्राचीन इतिहास आहे.
बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते.
तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथापरंपरा अगदी निर्विघ्न पणेपुढे चालू आहेत.
म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानथोर एकच जयघोष करतात.
‘ आई राजा उदोऽऽ उदोऽऽ!’
जय जगदंबा🕉👏🏻🔱

Thursday 30 August 2018

अहमदनगर जिल्हा सन्मान पुरस्कार प्राप्त विशेष गुणवत्ता धारक मानकरी बद्दल माहीती

अहमदनगर जिल्हा ,  नगर शहर तेली समाज  व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित

राज्य स्तरीय, " तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८" 

पुरस्कार प्राप्त विशेष गुणवत्ता धारक मानकरी बद्दल माहीती

१.वैभव गायकवाड हा केंद्रीय लाेकसेवा आयाेगाचे नागरी सेवा परीक्षेत देशात ५५१ क्रमांक व जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.  वैभव गायकवाड हे  नगर जिल्हयातील पिंपळगांव माळवी येथील एका सर्व सामान्य कुटंबातील आहेत. वैभव याने बी.ई मेकनिकल ची परीक्षा २०१२ साली ढाेले पाटील इंजीनियरिंग महाविद्यालय, पुणे विद्यापीठ मधून उत्तीर्ण हाेऊन २०१४ पासून ते यु.पी.एस.सी.ची तयारी करत हाेता.चाैथ्या प्रयत्नात  ते यशस्वी झालेत. दिल्ली येथील एका स्टडी सर्कल मधे त्यांनी यु.पी.एस.सी. परीक्षेची तयारी केली. सामान्य कुटंबातील, सामान्य शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला विद्यार्थी देखील जिद्द, चिकाटीने यशाच्या शिखरावर यजमान हाेताे याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव रघुनाथ गायकवाड़. त्यांना अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीने तेली समाज वैभव सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

 वैभव रघुनाथ गायकवाड़ सविस्तर जीवन सांख्यिक ( Biodata )
जन्म- १५ सप्टेंबर १९८९
गांव - पिंपळगांव माळवी
आजी - कै.रूक्मीनीबाई गायकवाड
आजाेबा- कै. साेन्यबापू गायकवाड
वडील- रघुनाथ गायकवाड
आई - शाेभा गायकवाड
प्राथमिक शिक्षण - श्रीराम विद्यालय, जिल्ह्यापरीषद शाळा पिंपळगांव माळवी
दहावी पर्यंत शिक्षण(२००४) - पिंपळगांव माळवी
उच्च माध्यमिक शिक्षण(२००६)- प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
पदविका (डिप्लोमा)(२००९) - मेकनिकल गर्व्हमेंट पालीटेक्नीक, अहमदनगर
पदवी (२०१२)- मेकनिकल इंजीनियर, ढाेले पाटील कॉलेज आफ इंजीनियरिंग, पुणे
यु.पी.एस. सी. ( नागरी सेवा परीक्षा) तयारी २०१४ पासून दिल्ली येथील स्टडी सर्कल मधे
यु.पी.एस. सी परीक्षा चाैथ्या प्रयत्नात २०१७ साली उत्तीर्ण, देशात ५५१ क्रमांक, अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांक

सविस्तर जीवन वृत्तांत: शिक्षण घेऊन स्वत: व्यवसाय करण्याचं स्वप्न. त्यादृष्टीने शिक्षणही घेतलं. इंजिनिअरिंगची डीग्री मिळाली. जॉबही मिळाला. तोपर्यंत यूपीएससीची काहीच माहिती नव्हती. त्यानंतर माहिती घेतली अन् यूपीएससीचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी दिल्ली गाठली. सलग चार वर्षे आत्मविश्वासाने अभ्यास केला. घरच्यांनीही खंबीर पाठिंबा दिला. या बळावर यूपीएससीमध्ये देशभरात ५५१ रँकवर नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील वैभव रघुनाथ गायकवाड याने यश मिळविले. त्याच्या यशोगाथेवर टाकलेला हा प्रवास...
वैभवचा जन्म नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील सर्वसामान्य कुटुंबातील. वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. घरात तीन भावंडं. त्यामधील सगळ््यात लहान असणा-या वैभवचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीपर्यंत शिक्षण गावातीलच श्रीराम विद्यालयात पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी नगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात सायन्स शाखेला प्रवेश घेतला. १२ वीनंतर शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथून मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुण्यात डीग्री मिळविली. डीग्री पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष नोकरी केली. तोपर्यंत यूपीएससी म्हणजे काय याची साधी ओळखही वैभवला नव्हती. वडील रघुनाथ यांच्या मित्राने यूपीएससीबाबत एकदा सहज बोलताना कल्पना दिली. ही कल्पना वडिलांनी वैभवला बोलून दाखविली. त्या दरम्यान त्याच्या हाती एक पुस्तक पडलं. मित्रानांही त्याच्यामधील गुणवत्ता ओळखून त्याला प्रोत्साहित केलं. स्वत:चा आत्मविश्वास, चिकाटी, कुटुंबीयांचा खंबीर पाठिंबा, मित्रांच्या साथीनं वैभवने यूपीएसच्या स्वप्नासाठी नोकरीला राम-राम ठोकला. यूपीएससीबाबत प्राथमिक माहिती घ्यायला त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा वैभवनं दिल्या. मात्र त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेड लागलं होतं. वैभवनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी २०१४ साली दिल्ली गाठली. येथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला. पहिले वर्ष यूपीएससी काय हे कळण्यातच गेलं. हळूहळू अभ्यासाची गती वाढली. दिल्लीतील एका स्टडी सर्कलमध्ये वैभवची निवड झाली. तिथे त्याच्या स्वप्नाला बळ मिळालं. पहिल्या प्रयत्नात त्याला पूर्वपरीक्षेची पायरीही चढता आली नाही. दुस-या प्रयत्नात तो मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचला. मात्र मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास झाला नाही. त्यामुळे थोडी निराशाही आली. मात्र तो खचला नाही. या प्रवासात अपयश आले तरी हरकत नाही, असे म्हणत घरचे पाठीशी होते. त्यानंतर स्वप्नसुद्धा अधिकारी झाल्याचे पडायचे. त्यानंतर १०० टक्के फोकस अभ्यासावर केंद्रित केले. घरच्यांनी या प्रवासात कधीच वैभववर दबाव टाकला नाही. तिस-या प्रयत्नात त्याने मुलाखतही दिली. मात्र त्याची निवड झाली नाही. घरच्यांनी सातत्याने आत्मविश्वास दिला. सकाळी दहा वाजल्यापासून अभ्यासाला सुरुवात व्हायची. दुपारी थोडा आराम करून अभ्यास सुरू राहायचा. मात्र सलगपणे अभ्यास करण्यापेक्षा दोन दोन तास अभ्यास करण्यास वैभवने प्राधान्य दिले. दिवसभरात ८ ते १० तास नित्यनेमाने अभ्यास करत असे. चौथ्या प्रयत्नात मात्र त्याने यश मिळवत देशात ५५१ क्रमांक मिळविला. त्याने पाहिलेलं स्वप्न चार वर्षांनंतर पूर्ण झालं. या सर्व प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन लाभले. लहान असताना आजोबा दिवंगत सोन्याबापू गायकवाड यांनी अभ्यासाची आवड लावली. अभ्यास करण्यासाठी सातत्याने बक्षिसे ठेवली. आजी रुक्मिणी यांनीही नातवांना कायमच मार्गदर्शन केले. याशिवाय आजोबांचे संस्कार वडील रघुनाथ यांच्यावर होते. स्वत: किराणा दुकान सांभाळून तीनही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. आई शोभा यांनी मोलाची साथ दिली. या शिवाय मोठे बंधू अमृत आयटी इंजिनिअर असून, त्यांनी सातत्याने वैभवला पाठिंबा देत प्रे्ररणा दिली. सगळा खर्च त्यांनी उचलला. बहीण डॉ. सुवर्णा विक्रम धारकर हिने सातत्याने पाठिंबा दिला. या शिवाय चुलती सुनीता अशोक गायकवाड यांनीही या प्रवासात साथ दिली. प्राचार्य ज्ञानदेव खराडे यांचेही मार्गदर्शन लाभले. सामाजिक कार्याचीही जपली आवड वैभव हुशार असला तरी लाजाळू. डिग्री होईपर्यत स्टेजवर आलाच नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा सातत्याने त्याच्या मनात होती. मित्राच्या मदतीने वैभवने गावात सामाजिक काम सुरु केले. गणेशोत्सवाच्या काळात वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. या माध्यमातून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढला. कोणतेही काम करताना कायम सकारात्मक राहायला हवे. तुमचे शिक्षण कोणत्याही माध्यमात झाले तरी काही फरक पडत नाही. मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. आम्हालाहाी इंग्रजी माध्यमातून शिकणा-या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागली. त्यामुळे माध्यमापेक्षा चांगले शिक्षण महत्वाचे आहे. पालकांमध्येही याबाबत जागरुकता असायला हवी. एमपीएससी किंवा युपीएससी हेच करीअर नाही. मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची माहिती लवकर होते त्यामानाने ग्रामीण भागात उशीरा माहिती होते. सद्यस्थितीत मराठी टक्का नक्की वाढत आहे. तुमच्या स्वत:मध्ये असणारा आत्मविश्वास तुम्हाला हमखाश यश मिळवून देतो. यश मिळाल्याने घरच्यांना सर्वात जास्त आनंद झाला. मला अपेक्षित असलेलं यश न मिळाल्याने मी सुरुवातीला नाराज होतो. मात्र सर्वांच्या आनंदाने आणखी आनंदित झालो. घरच्यांचे संस्कार, कष्ट, लोकांचे आशीर्वाद या सगळ््यामुळे यश मिळाले आहे. गावातील पहिलाच अधिकारी असल्याने सर्वांनी कौतुक, सत्कार केले. या यशामुळे नक्कीच जबाबदारी वाढली आहे. या माध्यमातून सामान्य लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. - वैभव गायकवाड


२.नितिन भास्कराव राऊत हा जामखेड येथील सामान्य शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला विद्यार्थी पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेत शिक्षण क्षेत्रातील सर्वाेच्च समजल्या जाणा-या "विद्यावाचस्पती ( पीएच डी )" पदवीने सन्मानीत केलेले आहे. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन या विषयात त्यांनी संशाधन प्रबंध विद्यपीठाला सादर केलेला आहे. त्यांना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायण गांव येथील डॉ जे.पी. भासले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना जिल्हा तेली समाजाचे वतीने तेली समाज "विद्याभूषण" सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.



३. प्रथमेश लुटे हा चांदवड ( नासिक) येथील असून काठमांडू (नेपाळ) येथे शेताेरू कराटे असाेसिएशनच्या वतीने २६ मे ते २९ मे दरम्यान झालेल्या २३ व्या  आंतरराष्ट्रीय हायस्कूल कराटे  ३५-४० वजन गटातून सुवर्ण पदक विजेता आहे. त्यांना अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीने "क्रीड़ा भूषण"  सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.



४. मयुरेश लाेखंडे हा राहुरी येथील सामान्य कुटंबातील ९वीत शिकणारा विद्यार्थी असून डॉ सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक परीक्षा राहुरी तालुकयातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. त्यांना भारतीय अंतराळ संस्था (इस्राे) बेंगलाेर येथे सहलीसाठी निवडलेले आहे.त्याला अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीन "बाल वैज्ञानिक" सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.



५.अशाेक डाेळसे हे अहमदनगर येथील कला शिक्षक असून खडू शिल्प कलेत विशेष प्रविण आहेत. त्यांना अनेक कला क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त आहे. त्यांना अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीन "कला भूषण" सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.



६. दगडू जाधव हे सेवा निवृत्त राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक असून सद्दया जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आहेत व जेष्ठ नागरीकांसाठी विविध कार्यक्रम राबवितात.त्यांना अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीने " समाज भूषण" सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.



७. कु. प्रियंका सुनिल शेंदुरकर, एम.बी.बी.एस. २०१८ व 

आेंकार सुनिल शेंदुरकर  एम.बी.बी.एस.२०१७- हे दाेन्ही बहिण भाऊ चिंचाेडी पाटील,अहमदनगर तालुकयातुन असून वैदयकिय पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण आहेत.व दाेन्ही इनर्टनरशीप करीत आहेत. त्यांना अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे वतीने " धन्वतरी भूषण" सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.


Wednesday 29 August 2018

" तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८"

अहमदनगर जिल्हा , नगर शहर तेली समाज व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित

राज्य स्तरीय, " तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८"


" समाजातील जेष्ठांनी समाज घडविला", हरिभाऊ डाेळसे
" प्रतिभावंतांना प्रोत्साहन द्या, त्यांचा आदर्श  घ्या ", डॉ सुधाकर चाैधरी
 " उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दया", वैभव गायकवाड
 " जेष्ठांचा सन्मान समाजाेपयाेगी स्तुत्य उपक्रम", मधुकर पन्हाळे








बुधवार दि. २२-८-२०१८ राेजी संध्या. ५.०० तेली पंचाचा वाडा, विठठ्ल रूक्मीनी मंदिर येथे अहमदनगर जिल्हा, नगर शहर तेली समाज व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित राज्य स्तरीय, " तेली समाज सन्मान पुरस्कार २०१८" उत्साहात पार पडला. काेणताही बाहेरचा पाहुणा न बाेलवता, अहमदनगर जिल्हयातील म्हणजे आपल्याच समाज बांधवांकडून आपल्याच किर्तीवंत, गुणवंत, यशवंत, विद्यार्थी, स्पर्धक, जेष्ठ वयाेवृद्ध इ. समाज बांधव, युवक, युवती यांचा यथाेचीत सन्मान साेहळा सन्मान चिन्ह देऊन संपन्न झाला.
या राज्य स्तरीय सन्मान पुरस्कार साेहळयाचे अध्यक्षपद सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी श्री मधुकर शंकरराव पन्हाळे यांनी भुषविले. सन्मान साेहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित जेष्ठ मान्यवर, गुणवत्ता धारक यांनी दीप प्रज्वलन व श्री संताजी महाराज यांचे प्रतिमा पुजनाने करण्यात आले. 
उदघाटनानंतर माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी, शहीद जवान, समाज बांधव, भगीनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नंतर सर्व मान्यवरांचे गंध, गांधी टाेपी, फेटा बांधुन स्वागत करण्यात आले.
सन्मान साेहळ्याचे कार्यक्रमासाठी  उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे आयाेजक श्री हरिभाऊ डाेळसे यांनी हार फेटा बांधून व शब्द सुमनांनी केले. स्वागत भाषणात श्री हरिभाऊ डाेळसे यांनी मारवाडी, ब्राह्मण समाज जसे एकजुटीने काम करतात, त्यांचे गरीब समाज बांधवांना अडी अडचणी मधे सांभाळून घेतात असा दाखला दिला. त्यांचे चांगले गुण घेणे, आपसातील हेवे दावे मत्सर, द्वेष बाजूला ठेऊन समाज कार्य करावे. समाजातील जेष्ठांनी समाज घडविला, आदर्श माता म्हणून महिलांचे याेगदान जसे आहे तसे समाजातील गुणवंत, प्रतिभावंत व कर्तृत्ववान तसेच समाजाची मान उठविणारे यु.पी.एस.सी. उत्तीर्ण वैभव गायकवाड या सर्वांचा आदर्श समाजापुढे आहे. हा सन्मान साेहळा उपक्रमातून एकाेपा, प्रोत्साहन, समाज बांधव यांचे प्रती आदर भाव निर्माण करणे. दरवर्षी १५ आँगष्ट, स्वातंत्र दिन हा *समाज गाैरव दिवस* साजरा करणे ही परंपरा हया वर्षी सुध्दा आम्ही प्रयत्न पूर्वक जाेपासली असल्याचे श्री डाेळसे यांनी आपले स्वागत भाषणात सांगितले.
सन्मान साेहळ्याचे ध्येय, उद्दीष्ठ, पुरस्कार निवड प्रक्रिया, पुरस्कार स्वरूप याबद्दल प्रास्तविक भाषण डॉ सुधाकर चौधरी यांनी केले. पुरस्कारासाठी निवड करतांना त्या विद्यार्थी, समाज बांधव यांचे कला, क्रीड़ा काैशल्य, वैज्ञानिक अभिरूची, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक कर्तव्य, जबाबदारी, समाजातील प्रतीमा, वागणुक, जेष्ठता या बाबी डाेळयासमाेर ठेऊन पुरस्कारार्थी यांची निवड केली गेली. या पुरस्कारामधे पहिली ते उच्च शिक्षणातील सर्वात सर्वोच्च पदवीत्तर सन्मान पदवी विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी, नेपाळ अंतरराष्ट्रीय स्पर्धेत कराटे क्रीड़ा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता चांदवडकर प्रथमेश लुटे, डॉ सी व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण, शिल्प कला निपुण कला शिक्षक श्री अशोक डाेळसे, राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक व जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करणारे श्री दगडू जाधव व यु पी एस् सी,  नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत भारतात ५५१ व अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, तसेच काैटुंबीक सामाजिक जीवनात वैशिष्ठ पूर्ण कामगीरी केलेल्या समाज माता अश्या ४२ गुणवत्ता धारकांची या साेहळयासाठी निवड केल्याचे चाैधरी म्हणाले. या विशिष्ट गुणवत्ता धारक यशवंत, किर्तीवंत, प्रतिभावंताना समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देणे, समाजाने त्यांचे गुणांची दखल घेउन आदर्श घेणे, त्या प्रमाणे इतरांनी प्रेरणा घेणे,  त्यांचे मार्गदर्शन इतरांनी घ्यावे. या पुरस्कारार्थींना समाज भूषण, विद्या भूषण, कला क्रीड़ा भूषण, बाल वैज्ञानिक असे पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन गाैरविण्यात येत आहे. अश्या साेहळ्याचे निमित्ताने सामाजिक संघटन, सामाजिक बांधिलकी, सदभावना समाज प्रबाेधन घडविणे अशी धारणा असल्याचे प्रा डॉ सुधाकर चाैधरी यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय तैलीक साहू समाज महासभेचे अध्यक्ष आमदार श्री जयदत्ता आण्णा क्षिरसागर यांचा शुभेच्छा संदेश सुद्धा या कार्यक्रमासाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या तेली सन्मान साेहळ्यात पुढील समाज बांधव व भगीनी यांना " समाज भूषण " पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
१. श्री शिवलिंग बबनराव चाैथे अहमदनगर, २. श्री शंकरराव अंबादास सुंदर अहमदनगर तालुका, ३.श्री काेंडीराम त्र्यंबक पतके पारनेर, ४. श्री सुदामराव महादेव गडदे काष्टी, ५. श्री ईश्वर आप्पा त्र्यंबकराव काेटकर पाथर्डी, ६. श्री ताराचंद गुंडाेबा शिंदे शेवगांव, ७. श्री गाेरखनाथ महादेव राऊत जामखेड, ८. श्री दगडू शंकरराव जाधव राहुरी, ९. श्री बाबुराव काशिनाथ महापुरे राहाता, १०. श्री रामनाथ दादा पांबळकर अकाेले, ११. श्री भागवत तुकाराम साळुंके बेलापूर, १२. श्री पंडित माेहनीराज पवार नेवासा, १३. श्री नानाजी बाळाजी भाेत संगमनेर, १४. श्री विठठ्लराव बन्सी भाेज कर्जत, १५. श्री बाबुराव काशिनाथ साळुंके वांबाेरी, १६.श्री अर्जुनराव किसनराव भगत बु-हानगर, १७. श्री विद्याधर नारायण कवडे राजूर, १८. श्रीमती कलावती रामचंद्र दारूणकर (आदर्श माता) अहमदनगर, १९. श्रीमती वत्सलाबाई नारायण देवकर (आदर्श माता) अहमदनगर
पुढील गुणवत्ता धारक गुणवंतांना तेली सन्मान पुरस्काराने उपस्थित मान्यवर मधुकर पन्हाळे, लक्ष्मण देवकर, प्रकाश सैंदर,  संभाजी जाधव, मनाेहर डाेळसे, डॉ सुधाकर चाैधरी, लक्ष्मण डाेळसे, जयवंत कवडे, सुरेश शिंदे, दिलीप साळुंके, कृष्णकांत सांळुके, गाेकुळ काळे, प्रभाकर डाेळसे, गाेकुळ, गाेकुळ बाेकेफाेड,  सुरेश देवकर, रावसाहेब देशमाने, शामराव करपे, संजय पन्हाळे, दत्ता भाऊ साेनवणे, शेख जलालभाई इत्यादिंचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
१. श्री अशोक बाबुराव डाेळसे अहमदनगर, कला शिक्षक - कलाभूषण
२. श्री वैभव रघुनाथ गायकवाड़ पिंपळगांव माळवी, यु.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण- समाज भूषण
३. डॉ श्री नितिन भास्कर राऊत जामखेड, पीएच. डी. - विद्याभूषण
४. कु. प्रियंका सुनिल शेंदुरकर चिंचाेडी पाटील, एम.बी.बी.एस.- धन्वंतरी
५. श्री  आेंकार सुनिल शेंदुरकर चिंचाेडी पाटील, एम.बी.बी.एस.- धन्वंतरी
६. चि. प्रथमेश महेन्द्र लुटे, चांदवड, आंतरराष्ट्रीय कराटे, सुवर्ण पदक - क्रीड़ा भूषण
७.चि. महेश हरीश्चंद्र काळे, अहमदनगर, कराटे, क्रीड़ा भूषण
८. चि. मयुरेश लक्ष्मण लाेखंडे, राहुरी, डॉ सी.व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षा तालुका प्रथम क्रमांक- बाल वैज्ञानिक
९. चि. राेहीत राजेंद्र शेजुळ, राहुरी, डॉ सी.व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण- बाल वैज्ञानिक (उत्तेजनार्थ)
१०. कु. भक्ति अशाेक टेकाडे, जामखेड, बी.ई.- सन्मान
११. श्री आदित्य राजेंद्र क्षिरसागर, लाेणी, बी.ई.- सन्मान
१२. श्री शुभम बाळासाहेब वाळके, काेल्हार, बी.ई.- सन्मान
१३. श्री प्रज्याेत शंकरराव हाडके, राहाता, प्लास्टिक इंजीनियर, पदवीका,- सन्मान
१४. कु. शुभदा डाेळसे, अहमदनगर- फैशन डिजाइनर मेटल स्टार- सन्मान
१५. कु.सुमेधा संजय समरीत, लाेणी, -१२वी विज्ञान- सन्मान
१६. चि.दिपक मधुकर देवकर, अहमदनगर, - १२वी- सन्मान
१७. कु. श्रद्धा डाेळसे, अहमदनगर, १०वी- सन्मान
१८.कु.श्रेयसी प्रमाेद क्षिरसागर, अहमदनगर, इ.१ली, - सन्मान
१९. चि. किसन शंकरराव क्षिरसागर, अहमदनगर, इ.१ली, - सन्मान
२०. चि. उत्कर्ष ढवळे, अहमदनगर- सन्मान
२१.चि. राेहन भगत, अहमदनगर- सन्मान
२२. कु. हर्षदा दहितुले अहमदनगर- बी.ए.- सन्मान
पुरस्कार निवड समीतीमधे डॉ सुधाकर चाैधरी, हरिभाऊ डाेळसे, रमेश साळुंके, अशोक डाेळसे, रावसाहेब देशमाने, संदीप साेनवणे, सचिन म्हस्के, गाेकुळ काेटकर, प्रमाेद डाेळसे, वसंतराव काळे सर, गाेकुळ बाेकेफाेड,  राजेंद्र टेकाडे, राजेंद्र क्षिरसागर, दत्तात्रय साेनवणे, शामराव करपे, श्री रामदास महाराज क्षिरसागर,  शांताराम काळे, आदिनाथ माेरे, इ. समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.
सत्काराबद्दल मनाेगत व आभार व्यक्त तसेच मार्गदर्शन करतांना यु पी एस् सी,  नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत भारतात ५५१ व अहमदनगर जिल्हयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैभव गायकवाड म्हणाले की, " समाजाने माझे पाठीवर शाबासकीची थाप मारून मला प्रोत्साहन दिले,  माझे हातून समाज कार्य व्हावे, हीच अपेक्षा माझ्या शिक्षणासाठी कष्ट करणारे आई, वडील व थाेरामाेठयांची आहे. त्यांचे प्रेम, संस्कारामुळे मी खडतर प्रसंगात अथक परिश्रम करून यु.पी.एस.सी. परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकलाे.आता या कष्टाचे चीज करण्याचे भाग्य मला प्राप्त झाले आहे. त्या प्रमाणे मी समाजिक जबाबदारीची जाणिव ठेऊन कार्य करीन." अशी ग्वाही श्री. गायकवाड़ यांनी उपस्थित समाज बांधव यांना दिली. वैभव गायकवाड पुढे म्हणाले की, " आपले मुलांची क्षमता, कल आेळखूून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दया. मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता मुलींना सुद्धा उच्च शिक्षण दया. हुंडा न देता पैसा मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करा. घरच्या उद्योग व्यवसायात मुलांना  अडकविल्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. समाजामध्ये उच्च शिक्षणाचा अभाव आहे, याचा समाजाने प्रथम विचार करावा".
"चि. वैभव गायकवाड, चि. नितिन राऊत, चि. प्रथमेश लुटे, प्रियंका शेंदुरकर इत्यादी गुणवंत विद्यार्थी, जेष्ठांचा मान सन्मान हा समाजाेपयाेगी स्तुत्य उपक्रम आहे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे आयोजक श्री हरिभाऊ डाेळसे, डॉ सुधाकर चाैधरी व त्यांचे सहका-यांच उद्देश्य सफल झालेला आहे. हा साेहळा राज्य स्तरीय ठरला आहे. हा उपक्रम दरवर्षी राबवावा". असे अध्यक्षीय भाषणात प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी श्री मधुकर पन्हाळे यांनी सुचविले.
या तेली समाज सन्मान पुरस्कार प्रसंगी स्नेहीजन मासिकाचे संपादक श्री छगन मुळे यांनी देखील त्यांची उपस्थिती नाेंदवली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संयुक्तपणे श्री आदिनाथ माेरे व प्रा डॉ सुधाकर चाैधरी यांनी केले.
शेवटी सुरेश देवकर यांनी सर्व संबंधितांचे, उपस्थितांचे, आभार मानले.
पुरस्कार साेहळयास जवळपास २०० समाज बांधव व भगीनी उपस्थित हाेते. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम केलेली हाेती.
डॉ सुधाकर चाैधरी, हरिभाऊ डाेळसे, रमेश साळुंके, अशोक डाेळसे, रावसाहेब देशमाने, संदीप साेनवणे, सचिन म्हस्के, गाेकुळ काेटकर, प्रमाेद डाेळसे, वसंतराव काळे सर,  राजेंद्र टेकाडे, राजेंद्र क्षिरसागर, शामराव करपे, श्री रामदास महाराज क्षिरसागर, आदिनाथ माेरे,  लक्ष्मण देवकर, प्रकाश सैंदर,  संभाजी जाधव, मनाेहर डाेळसे, लक्ष्मण डाेळसे, जयवंत कवडे, सुरेश शिंदे, दिलीप साळुंके, कृष्णकांत सांळुके, गाेकुळ काळे, प्रभाकर डाेळसे, गाेकुळ शिंदे, गाेकुळ बाेकेफाेड,  सुरेश देवकर, रावसाहेब देशमाने, शामराव करपे, संजय पन्हाळे, दत्ता भाऊ साेनवणे, उद्धव क्षिरसागर, देविदास ढवळे,  ज्ञानेश्वर काळे, मिलींद क्षिरसागर, बाळकृष्ण दारूणकर, साेमनाथ देवकर, परशराम सैंदर, श्रीकांत साळुंके, देवीदास साळुंके, बबनराव सैंदर, मच्छिंद्र देहाडराय, पेंटर क्षिरसागर, राजू काेटकर, अनिल देवराय, बाबुराव महापुरे, प्रमाेद वाळके, राजेश सटानकर, श्रीकांत वाघ,  शेख जलालभाई, नंदु शिंदे, कृष्णा नागले, संताेष क्षिरसागर, पुरूषाेत्तम सर्जे, शंकरराव हाडके, जयंत कर्डीले, अशाेक वालझाडे, बाबासाहेब जुंदरे, बंडाेपंत शिंदे, शांताराम पाटील, सुभाष दहितुले, किरण शिंदे, किरण भगत, गाेकुळआप्पा शेजुळ, लक्ष्मण लाेखंडे, कैलास शेजुळ, चैताली देवकर, पुनम दारूणकर, मिराताई डाेळसे, अंबटकरताई, मनिषाताई देवकर, मंदाताई डाेळसे, दारूणकर ताई, ऊषाताई सैंदर, लताताई क्षिरसागर, माधुरी पाटील इत्यादिं समाज बांधव व भगीनी यांनी कार्यक्रम यशस्वी हाेणेसाठी परिश्रम घेतलेत व कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शाेभा वाढवली.
                                                   जय संताजी!